STORYMIRROR

Deepali Mathane

Others

3  

Deepali Mathane

Others

होळी पोर्णिमेचा सण

होळी पोर्णिमेचा सण

1 min
254

होळी पोर्णिमेचा सण 

मराठमोळ्या संस्कृतीचा

संस्कृतीक वारसा जपला 

संगे घेऊन प्रकृतीचा


    एरंडीची पाने वाहून

  प्रल्हादाच्या निस्सीम भक्तीचा

   होई जागर घरोघरी

   भक्तीच्या शक्तीचा


नैराश्याची होळी पेटू दे

प्रकाश पसरूनी आशेचा

हेवे-दावे विसरूनी सारे

दीप मनी जागो मायेचा


   धुलीवंदनाच्या दिवशी

   रंग दिसू दे समतेचा

   माणसाला माणूस समजून

   रंग उधळू दे ममतेचा


पुरणपोळीचा गोडवा

 घूमू दे जीभेवरही शब्दांचा

नारळाच्या आहुतीने

नाश होवो आपदांचा


    गौऱ्या अन् चाकोल्यांनी

    साज सजवला होळीचा

   हाळ पेटवला मनोभावे

   रचवूनी शुष्क मोळीचा


दारिद्र्य, दुःख अन् निराशा

करा अंत नकारात्मकतेचा

प्रगतीचा डोंब उसळूनी गगनी

पसरू दे सूर सकारात्मकतेचा


Rate this content
Log in