हेमा पंचदश काव्य.......पुनवराती
हेमा पंचदश काव्य.......पुनवराती
1 min
224
पूनवराती
चंद्रमा नभात या सजला
वीणेची तार
छेडूनी आसमंत भिजला
पूनवेला ती
छेडी तार सूर उमगला
प्रीतीचा वारा
आज असा मज बिलगला
खग विहरे
नभात पोर्णिमेच्या रात्रीला
सूर छेडिते
ललना गोंजारूनी प्रीतीला
