हे शिवशंकर शंभो
हे शिवशंकर शंभो
1 min
331
कैलासपती शिवचंद्रमौळी
गौरीहरा तूच गंगाधरा
चंद्र तव मुकुटी झळाळी
हे शिव शंकर शंभो
भस्म चर्चूनी सर्वांगी
मनुष्य मुंड माळ गळा
पार्वती तव अर्धांगी
हे शिव शंकर शंभो
नंदीहर तू नंदीकेश
विश्वाचा तू विश्वनाथ
कैलासराणा तू सर्वेश
हे शिव शंकर शंभो
कर्पूरगौरा तू सकला
नीळकंठ खट्वांगधारी
हर भक्तांसी जाहला
हे शिव शंकर शंभो
।।ॐ नमः शिवाय।।
त्रिनेत्रधारी दयाळा
सर्व व्यर्थ तव कृपेशिवाय
