STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

हे जिंदगी...

हे जिंदगी...

1 min
356

तुझ्या एका नाटकातलं पात्र मी व्हावं 

नाना अपेक्षांचं गाठोडं वाहून न्यावं 

निराशेचा पडदा पडताच कवेत तू घ्यावं 

हे जिंदगी...मी तुला पुन्हा एक संधी द्यावी...

तू पुन्हा एकदा नवं नाटक रचतं घ्यावं 

ज्यात विरून जावीत पात्र भाबडी सारी 

अन भेटावीत काही नवी ज्यात मी विसावी 

पडदा पडताच त्यातली 'मी' मला भेटावी 

अन पुन्हा एकदा प्रवास नव्याने व्हावा सुरु 

हे जिंदगी...मी तुला पुन्हा एक संधी द्यावी...


Rate this content
Log in