STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Others

3  

Shrikant Kumbhar

Others

हात.....

हात.....

1 min
407

हात


हातात हात घेतला 

तर मैत्री होते

दोन्ही हात जोडले

तर नमस्कार होते.

हातावर हात आपटला

तर टाळी होते

कुणाला हात दाखवला

तर धमकी होते

हात वर केले

तर असहाय्यता दिसते

हातावर हात ठेवले

तर निष्क्रियता दिसते

हात पुढे केला

तर मदत दिसते

हात पसरले

तर मागणी होते

हाताचे महत्व इतकं

अनेक हात पुढे आले

तर अशक्य ते शक्य होते



Rate this content
Log in