हात माझे जगन्नाथ...
हात माझे जगन्नाथ...
1 min
332
कष्ट केल्याविना
मिळत नाही फळ
हात पोळल्याविणा
भागत नाही पोटाची कळ...
वीतभर पोटाची खळगी
भराया करावे अपार कष्ट
उपसूनी मेहनतीचा रगाडा
होती हातावरील रेषा नष्ट...
ही माती जाणतसे
स्पर्श मम हाताचा
कष्टाने पेरलेल्या
थेंब थेंब घामाचा...
कष्टाचे या व्हावे मोल
नको ठराया कवडीमोल
हात माझे जगन्नाथ
मेहनत असे अनमोल...
