STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

4  

VINAYAK PATIL

Others

गुरूंना आदरांजली

गुरूंना आदरांजली

1 min
234

वैकुंठ गमन झाले 

अश्रु वाहीले नयनी 

आधार नाही राहिला

राहिल्या त्या आठवणी ||१|| 


आठविले क्षण सारे 

वाहती मोसमी वारे

उघड्या डोळ्यांनी त्यांनी

पाहिले मुलात तारे ||२|| 


नाव काढले गुरूंचे

ताऱ्यांचे तेज वेगळे

आसमंतही दिपले

पाणावले माझे डोळे ||३|| 


वैकुंठी बसूनी पाहे 

प्रत्येक ताऱ्यात तेज

खात्रीने ते सांगायाचे

किती असे तरबेज ||४|| 


आशीर्वाद देऊनिया

हात ठेवी पाठीवरी 

भिऊ नकोस म्हणूनी

साद घाली मनावरी ||५|| 


वैकुंठवासी जाहले 

शिष्यां अंतरी उरले

म्हणुनी आठवणीत 

मज हे काव्य स्फुरले ||६|| 


इतकेच विनवितो 

शांती लाभुदे तुम्हासी 

नाते जुळूनी राहू दे 

आशीर्वाद हा पाठीशी ||७|| 



Rate this content
Log in