गुरुगौरव गीत.
गुरुगौरव गीत.


5 सप्टेंबर दिनाला,या शिक्षक दिनाला
आहे कुणाचे योगदान,सक्षम भारत करण्याचे.
राहवा कायम स्मरणात,दिवस भारताच्या इतिहासात
आदर्श पिढ्या घडविण्यात,साक्षर भारत करण्यात
नको अडाणी इथे कोणी,शिक्षण घ्यावे सर्व भारतीयांनी
शिक्षणाची धुरा सांभाळली,थोर शिक्षण महर्षीनी
बहुमोल आहे शिक्षण याचा प्रसार व्हावा देशात
आदर्श शिक्षण पद्धती,राबवावी समान सर्व जनांत
करावा आदर्श निर्माण,जगात व्हावा तिचा सन्मान
भारतीय शिक्षण व्हावे जगाचे आदर्श शिक्षण
याला कुणाचे योगदान,समजून घ्या रे सर्वजण
देह झिजविला ज्यानी त्यांचे नित्य व्हावे स्मरण
त्यांच्या कार्याचा व्हावा, सन्मान या दिनाला
माहीती द्यावी थोर कार्याची पिढयां पिढीला
डॉ.सर्वपल्ली राधा कृष्णन,सावित्रीबाइना वंदन करून
आदर्श त्यांचा ठेवून शिक्ष
ण मिळावे सर्वांना समान
फातिमा शेख,शाहू,फुले,आंबेडकर शिक्षणाचे वारसदार
कर्मवीर भाऊराव पाटील, सर्व शिक्षणाचे शिल्पकार
यारे,यारे सारे जण,करु या त्यांचे स्वप्न साकार
खरे भविष्य आहे त्यांच्या आदर्श विचारावर
स्वप्न विकासाचे आपण साधू या शिक्षणातून
शिक्षणाचे अगाध धन महत्त्व घ्या सारे समजून
आदर्श विद्यार्थी,आहे देशाचा कायम आधार
तरूणांचा हा देश त्याच्या चालावा विचारावर
जीवन सार्थकी लावावे,जीवंत मने घडविण्यात
शिक्षक,विद्यार्थी ,समाजाने ठेवावे शिक्षणाला जीवंत
राष्ट्रभक्ती,त्याग,संस्कृती मुल्ये जपावी शिक्षणातून
सर्व संस्कार आदर्श मूल्यांचे शिक्षाणातून व्हावे जतन
होइल विकास आधुनिक नव्या भारताचा
तंत्रज्ञान,संगणनकीय प्रणाली,प्रगतीचा
भावी भारत घडविण्याचा,स्वप्न सत्यात येण्याचा