गर्व
गर्व
1 min
315
स्वभावाचे असती पैलू
क्रोधी , लोभी , निरागस
कोणी अभिमानी वा गर्वीष्ठ
तर कोणी निष्पाप लोभस
स्व अभिमान हा हवाच
तया वदती स्वाभिमानी
घेता गर्वाने जागा मनात
होतो स्वभाव अभिमानी
गर्व नेतो जीवन लयास
जैसे गेले बलाढ्य रावणाचे
प्रकांड पंडित शिवभक्त जरी
गर्वहरण झाले त्याच्या पराक्रमाचे
गर्व करु नये कदापि पैशाचा
रहात नाही समाजात मान
लक्ष्मी च ती , असते चंचल
ठेवावे सदा तियेचे भान
गर्व असावा मायबोलीचा
पुरविली ज्ञानाची तहान
तोच गर्व असावा मायभूमीचा
जिच्या कुशीत होतो महान
