STORYMIRROR

Prachi Deshpande

Others

4  

Prachi Deshpande

Others

गरुडझेप

गरुडझेप

1 min
928

प्रत्येकाच्याच स्वप्नांत उंच गरुडझेप !

पण चिमणी-कावळ्यांचेच पंख घेऊन, आम्ही आकाशात मारून येतो खेप..😆


अमर्याद ते आकाश आणि हक्काची घरट्याची जागाही ती ठरलेली ; 🏠

म्हणून , हाकेच्या अंतरावर राहण्याची गाठ मनाशी पक्की बांधलेली ..

हाक दिल्यावर ते पाखरू परततं..

   कधी मुला-मुलीचं काळीज म्हणून काळजीनं परततं;

   कधी नात-नातू म्हणून आधार बनून माघारी येतं ;

   कधी मित्र-मैत्रीण म्हणून सुख -दुःखाचे क्षण वाटायला येतं ;

    तर कधी, माणुसकी लक्षांत ठेवून गरूडझेप विसरण्याचा निर्णय घेतं !


त्यामुळे.....

कधी झाडाकडे पाहून वाटे, तुझ्यासारखे मातीत घट्ट रुजावे! 🌳

सावली देत, आपल्या माणसांसोबत हसत खेळत वाढावे ...

पण फांदीवरचे पक्षी उडून गेले की वाटायचे आपणही उंच उडावे !😇


हौस तरी काय त्या स्वप्नवत गरूडझेपेची ????????

   ती झेप दृष्टी देते

   आपल्या चौकटी बाहेरचे जग समजावते  

   स्वतः सोबतचा संवाद शिकवते 

   कुणालाही पंखात घेता येईल एवढे मोठ्ठे पंख देते......😊

आणि हृदयात माणुसकी असेल तर जमिनीवर राहून सुद्धा गरुडझेप घेता येते


आपल्या माणसांसाठी हाक दिल्यावर येणं, पंखाला बळ देणारं ठरावं !

गरूडझेपेचं स्वप्न मात्र प्रत्येकाने साकारावं !

मातीत तर कधीही रुजता येतं, ती कधीही आपलंसं करते !

पण झेप मात्र पंखात बळ असेल तोवरच घेता येते ! ..


Rate this content
Log in