STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

गरज

गरज

1 min
228

चांदणे आज रडते

नभ अश्रुंनी वाहते

हरवली माझी साथ

काळजी मग करते


आज सर नकळत

मातीशी कशी भिड़ते

रडते कोसळताना

अंकुरातुन हसते 


गरज असे मातीला

चिंब चिंब भिजण्याची

थेंब स्पर्शती मातीला 

साथ देती जगण्याची


मन आलया भरुन

पाहून ती हिरवळ

गरज मनाला ओढ़े

त्या पानांची सळसळ 


Rate this content
Log in