STORYMIRROR

Shreya Shelar

Others

3  

Shreya Shelar

Others

गर्भामधले बाळ*****

गर्भामधले बाळ*****

1 min
11.7K

सांगे तुम्हा करून विनवणी

गर्भामधले बाळ

असो मुलगा किंवा मुलगी

करा हो सांभाळ

माझा करा हो सांभाळ

अधिकार आहे

मलासुद्धा जगण्याचा

हक्क आहे माझाही

हे सुंदर जग बघण्याचा

घालू नका घाव हो मजवर

बनूनिया काळ

करुन सोनोग्राफी तुम्ही

लावता तपास

ठेवता मुलाला बाकी

मुलीला गळफास

सांगा काहो तोडली तुम्ही

माणुसकीशी नाळ


Rate this content
Log in