ग्रामीण जीवन
ग्रामीण जीवन
1 min
12.2K
साधी सोपी राहणी
साधे जीवनमान
साधा सरळ विचार
साधाच आहार विहार//1//
गावातच मिळे सर्व काही
इतर काही हवे नाही
शेती करून घाम गाळून
जीवन आनंदी जगून दाऊ//2//
घरी जाऊन गुरांना देऊ चारा
बाळगोपाळांना शिकून स्वावलंबन धडा
निसर्गाच्या सान्निध्यात राहून
मन ठेऊ नेहमी प्रसन्न//3//
ग्रामीण जीवन आमचे असे छान
शिक्षण येथील उत्तम
मुले बागडत असतात सर्वोत्तम
खेळाडू, कवी यांना मिळे मान
आम्हा ग्रामीण जीवनाचा अभिमान//4//
