ग्रामीण भारत.....
ग्रामीण भारत.....
1 min
300
डोळ्यापुढे येतो माझ्या परत
किती छान होता ग्रामीण भारत.....
ना होता मोबाईल ना होता खेळ
फोनवर होता सारा जीवनाचा मेळ
तार आणि पत्र वाचून दुःख होतं सरत....
वाहनाची नव्हती इतकी दरवळ
मनुष्याच्या झाली ना कधी तळमळ
प्रदूषणात नव्हत कोणी इतकं झुरत.....
सोन्यासारखा होता देश हिरवागार
पर्यावरण होऊ लागल हळूहळू ठार
खेड्यातल जीवन शहर आहे नष्ट करत....
रंग बदलले बदलला आहे वेश
संगम स्वप्नांत पाहतो ग्रामीण देश
तीळ तीळ आहे रोज माझं स्वप्नं मरत.....
