STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

गोंदण

गोंदण

1 min
1.0K

गोंदण हे सख्या,

तुझ्या माझ्या प्रेमाचे प्रतीक.

एकमेकांस दिलेले वचने,

स्मरणास हे मार्गदर्शक........१


दोघांचे असीम प्रेम,

ह्या नक्षीरुपात गोंदले.

प्रेमाचे प्रत्येक क्षण आठवणीत,

राहण्यासाठी ते हातावर सजवले.......२


हातावरील हे गोंदण,

पाहून कितीदा मी लाजले.

त्या प्रेमळ मधूर आठवणीचे क्षण,

जणू चक्रव्यूहात जोडून गुंफले.......३


दोघांच्या ह्दयातले तुफान,

सदैव करते आठवण.

तुझ्या सहवासाचे प्रत्येक क्षण,

हे अमृत्युल्य गोंदण......४


तू दिलेले घाव ते,

काळजात खोल खोल उतरले,

गोंदण होऊन ते,

रक्ताच्या थेंब थेंबाने लिहिलेले.....५


बदलले रूप गोंदणाचे,

आताचे युग हे टॅटूचे.

हेतू तोच प्रितीचा मोहर,

एक दुसऱ्यांसाठी आळवण्याचे......६


माझा हाताच गोंदण,

सखा सजनाच्या प्रेमाची खूण.

गोऱ्या हातावर शोभतय,

पाहत बसतय साजण.......७


तुझ्या प्रेमाचे निशाण,

बसल होऊन हातावर गोंदण.

सुख दुःखाचे पाहतय आदंण,

ह्दयात प्रितीचे स्फुरद स्पदन......८


तुझ्या माझ्या भेटीचे ते क्षण,

ह्दयातील आकाशाचे चांदण.

बहरत गेले कशे ते दिन,

वेड लावी मज पाहता हातचे गोंदण.......९


आपले प्रेम सदा बहरावे,

पुन्हा एकमेकांसाठी जगावे.

आयुष्यात चुकून हरवलो तर,

ह्या गोंदणाने भेटवावे......१०


Rate this content
Log in