STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

गोडवा मकरसंक्रांतीचा

गोडवा मकरसंक्रांतीचा

1 min
1.0K

आला सण संक्रांतीचा 

नाही आनंदाला तोटा 

नववर्ष आरंभी आला 

सण संक्रांति मोठा ||१|| 


तिळगुळाला महत्त्व असे 

संक्रांतीच्या पवित्र सणाला 

तिळा गुळाचा महिमा असा 

जसा गोडवा माझ्या मनातला ||२|| 


पतंग उडविण्याची होई 

सुरुवात या सणाला 

आनंदाची लहर येई मनी

पतंग भिडे गगनाला ||३|| 


हळदी कुंकवाचे महत्व 

असे सणामध्ये फार 

भगिनी साऱ्या मिळुनी

आनंदाने साजरा होई सणवार ||४|| 


Rate this content
Log in