गणरायाची सवारी....
गणरायाची सवारी....
1 min
370
हो साऱ्या जगाचा गणराज कैवारी
वाजत गाजत आली गणरायाची सवारी....
वाट पाहिली वर्षभर तुमची
गणराया सेवा स्वीकार करा आमची
बापाच्या आगमनाची जल्लोष तयारी....
गणरायाला पाहून सारे दु:ख विसरू
सारे मिळुन हो जगाचे दु:ख आवरू
गणराया आले दारी मी त्यांचा आभारी.....
गल्लीत डी जे ही वाजाया लागले
लहान थोर आनंदाने नाचाया लागले
माझ्या गणरायाची मूर्ती हो लई भारी.....
गणराया मी तुमची मी सेवा करीन
माझं सारं दुख तुमच्या चरणी ठेवीन
गणराया पाठीशी संगमला कोण मारी.....
