गणपती
गणपती
1 min
261
आले आले गणपती आले
मन साऱ्यांचे आनंदित झाले... ॥धृ॥
घेउनी ताट पुजेचे
हातात हार फुलांचा
गणपतीच्या स्वागताला
जमला घोळका मुलांचा... ॥१॥
स्वागत पार्वतीनंदनाचे
चला थाटात करू या
"गणपती बाप्पा मोरया"
असे जोशात म्हणू या... ॥२॥
नैवेद्य बाप्पाला मोदकांचा
हिरव्या दूर्वांची जुडी
टाळ्या वाजवून म्हणू या
आरतीची न्यारीच गोडी... ॥३॥
आणली डाव्या सोडेंची
सुबक, सुरेख गणेशमूर्ती
तिची करून प्राणप्रतिष्ठा
लावल्या निरांजनात वाती... ॥४॥
ह्या लाडक्या लंबोदराला
मूषक वाहन शोभते
मला गणपतीची गोडी
दिवसरात्र बाप्पाला पूजते... ॥५॥
