गणपती आला
गणपती आला
1 min
294
ढोल ताशांचा
आवाज हो झाला
आला हो गजानन
गणपती आला
चिल्लर पार्टीला
आनंद हो झाला
गजमुख,गणराज
नाचत हो आला
मखराचा देखावा
तयार हो झाला
दुःख लोटण्या विघ्नेश
विघ्नहर्ता हो आला
हेरंबा सह मूषक
दास हो आला
प्रसाद मोदक
चोरीला हो गेला
एकदंत वक्रतुंड
नामघोष हो झाला
संकटमोचक गौरीसुत
लंबोदर हो आला
विनायक व्यंकटेश
विकट नावे हो त्याला
नावाचा त्याच्या
जयजयकार हो झाला
