STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

गणितातील गमती जमती

गणितातील गमती जमती

1 min
608

गणिताची सुरुवात झाली शून्याने 

शून्य म्हणता-म्हणता संख्या लिहू लागलो अंकाने आणि अक्षराने 

संख्या लिहीता-लिहीता ओळख झाली छोट्या आणि मोठ्या संख्यांची 

बघता बघता ओळख झाली एकक, दशक, शतक आणि चढत्या व उतरत्या क्रमाची 


बघता बघता आली बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार 

त्यांनी माजवला मोठा हाहाकार 

कुणाची बेरीज करावी,

कुणाची वजाबाकी, 

कुणाचा गुणाकार करावा, 

कुणाचा भागाकार हा प्रश्न काही सोडविना 

काही केल्या हा तिढा आयुष्यभर सुटता सुटेना 


बघता बघता सोबतीला आला बीजगणित खास 

बीजगणितातील सूत्रांनी केला नाहक त्रास 

एक गणित सोडवता सोडवता चांगलीच दमछाक होई

त्यांच्या अनेक पद्धती पाहून चांगला घाम फुटून जाई 


थोड्या अंतरावर गेलो आणि झाली ओळख भूमितीची

बघता बघता आले त्रिकोण आणि चौकोन सोबत घेऊन परिमितीची

या सर्वांच्या परिमिती ने केला मोठा अट्टाहास 

आणि क्षेत्रफळ म्हणाले मीच मोठा खास 


या सर्वांची सांगड घालता घालता कधी यामध्ये सामावून गेलो कळालेच नाही 

आणि हेच गणित आयुष्याचा भाग कसे बनले हे उमगलेच नाही 

म्हणूनच म्हणतो गणितासारखा विषय नाही, गणितासारखा विषय नाही


Rate this content
Log in