गंधाळली गंधवती
गंधाळली गंधवती
1 min
248
दिसे रूप मनोहर
मना पाडते ग भुल
देत आनंद जगाला
फुटे दगडा पाझर
रातराणी दारातली
गंधाळली गंधवती
शिंपवित परिमळ
नाचे प्रेम बहरती
झरा ममतेचा देत
नित्य नवी मिळे स्फूर्ती
हर्ष उल्हासलं मनी
झाली गर्भार धरती
सुगंधी स्वप्न सोबती
नसे कशाचा हव्यास
तृप्त मन आनंदती
देवा नित्य तुझा ध्यास
