गमवण्याचे दुःख
गमवण्याचे दुःख


गमवण्याचे दुःख तुला
पदोपदी झेलतो आहे
क्षणोक्षणी भास तुझा
आजूबाजूला होत आहे
तुझी इतकी सवय होती
विरान सारे रान झाले
बहरलेल्या बागेला आता
पानगळतीचे डोहाळे आले
धीर एकवटून उभारलो जरी
सैरभैर होते घरटे
आठवणींच्या हिदोंळ्यावर
मारत राहते सदैव खेटे
गमवण्याची सल मनात
घर करून राहिली आहे
तुझ्या नसण्याने जीवनात
एक उणीव गहिरी आहे