STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

गजानन स्तवन

गजानन स्तवन

1 min
488

देवा गजानना । गौरीच्या नंदना ।

तुझी आराधना । भक्तिभावे ।।


बुद्धीची देवता । तूच सुखकर्ता ।

तूच दुःखहर्ता । जगताचा ।।


संकट मोचक । वाहन मूषक ।

भक्तीचा सेवक । तुझ्या पायी ।।


मनी तुझी आस। रूप तुझे खास ।

दहा दिन वास । वर्षाकाठी ।।


कटी पितांबर । तूच लंबोदर ।

नामाचा जागर । घरोघरी ।।


बप्पा गणपती । तुझीच आरती ।

आनंदा भरती । उत्सवात ।।


गजासम मुख । देई जगा सुख ।

वाटे रुख रुख । निरोपात ।।


Rate this content
Log in