STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

घुंगरू

घुंगरू

1 min
670

ध्वनी मंजुळ कानावरी,

बांधले जरी पायावरी.

स्वर उधळीत सतरंगी,

रूमझुम आवाज करी.


चाळ मैफिल रंगवी,

घुंगरू गीत गाऊनी.

रंगत गाण्याची वाढवुनी,

साथ वाद्यांना देऊनी.

येऊन सर्व एकत्र,

स्वर ध्वनी निर्माण करी.

स्वर उधळीत सतरंगी,

रूमझुम आवाज करी.


गीत होईल का पुर्ण,

हे आभुषण संपुर्ण.

नृत्यागंणेचा शृंगार अपूर्ण,

घुंगरू करते पुर्ण.

सौदर्य आहे अपुर,

शृंगार केला किती जरी.

स्वर उधळीत सतरंगी,

रूमझुम आवाज करी.


गीता सोबत गाऊन,

तालाला ताल देऊन. 

छुमछुम आवाज करून,

आसमंत गेलं भरून.

नृत्य करते नार देखणी,

घुंगरूच्या ताला वरी.

स्वर उधळीत सतरंगी,

रूमझुम आवाज करी.


एक एक सुर वेचुनी,

सप्तसुर गुनगुनी मनी.

नखरा कलावंतीचा पाहुणी,

कीर्ती झाली सर्व जनी.

रूपाने पाडते भोवळ,

हि नार सुकूमारी.

स्वर उधळीत सतरंगी,

रूमझुम आवाज करी. 


Rate this content
Log in