घर
घर
1 min
219
जवळ आलं माझं जन्म दिलेलं घर
जन्मोजन्मी देवा माझ्यावर उपकार कर .....
अनोख्या शहरात राहिलो तीन वर्ष
खूप आनंद ही मिळाला मनाला हर्ष
मिळावी शांती म्हणुन सारे केले दूर....
तिथे जगावेगळे मित्र मला मिळाले
कष्ट कसे करतात तिथे मला कळाले
केलं हॉटेलमध्ये काम क्षण ते मजबूर....
डोळ्यात आले पाणी मीच पुसले !!
होते नातेवाईक कधी ते ना दिसले
एकांतात तिथे मिळाला कवितेचा सूर.....
आभारी मी तिचा जी सोडून गेली
संगमला आज ती कवी बनवून गेली
विसरू कसे क्षण मी ना इतका चतुर....
