STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

घर दोघांचे

घर दोघांचे

1 min
290

घर दोघांचे*

छोटे असले तरी ही

घरकुल माझे प्रेमाचे   

जिव्हाळ्यात मस्त झुलते

घर दोघांचे प्रेम मायेचे !!


राजाराणी आपण दोघे

आहे दोघांचे घरकूल

अर्धी अर्धी भाकर खावू

राहू सुखाने हसरे फुल !!


सकाळचा सूर्य तू अन

मी संध्या समईची वात

दुपारची उन क्षमवूनी

 त्यावरी करू मात  !!


मर्यादेचा पैलू पाडून

चमक भरूया त्यात

जिद्दीने करू सामना

सु:ख दुःखाची साथ !!


घर दोघांचे लेेकूरवाळे

कार्य ही दोघे घेवूया वाटून 

माया ममता देवून पाखरा

करू उज्वल भविष्य छान !!


दिव्यामधले तेल जसे

वातीत मिसळून जाई

सविनय संसार खुशिने

मग शांती चालत येई !!


गुलाबात जसे कांटे असती

म्हणुन चिडूनी कां जावे 

गुलाब काट्यात समजूनी

सुखाची भावना दुनावे !!


Rate this content
Log in