घे भरारी
घे भरारी
1 min
632
असे किती वाढशील जोमात रोपा
एखाद्या विशाल वृक्षाच्या गर्द छायेत..
सुरक्षिततेचे भास असतील क्षणिक
लुप्त होशील खचित दुनयेच्या मायेत..!!
वेष्टणाची चमक डोळ्यांना भुलवणारी
तरी मोल खरे आतील वस्तुस असते..
नजर पड़ताच वस्तूवर लोकांची
वेष्टन मग आपसूक कचऱ्यात जाते..!!
भास्करच्या दैदिप्यमान प्रकाशात
मोहक चंद्रही नित्य फीका पडतो..
इवलासा काजवा पण स्वयंप्रकाशीत
तिमिरातही तो मस्त चमचमतो..!!
गरजेपुरते वापरा आणि फेकून दया
ही बदलत्या जगाची रीत न्यारी..
सांभाळून ठेव तुझ्या अस्तित्वाला
अन् घे स्वःकर्तुत्वाने गगनी भरारी ..!!
