STORYMIRROR

Rajan Jadhav

Others

3  

Rajan Jadhav

Others

गे माय थोर तुझे उपकार

गे माय थोर तुझे उपकार

1 min
216

पारतंत्र्याच्या विळख्यातूनी 

 सोडवण्या दिधले लाखो प्राण

  गे माय थोर तुझे उपकार ।।१।। 


तुझ्या रक्षणार्थ जाहल्या 

 वीर शहिदांची घेऊनि आन 

  गे माय थोर तुझे उपकार ।।२।। 


गंगा यमुना हिंद हिमालय 

 चोहोबाजूंनी वाढवी तुझी शान 

  गे माय थोर तुझे उपकार ।।३।।


इथेच जन्मली जिजाऊ साऊ

 रमा अहिल्या विसरुन सारे भान 

  गे माय थोर तुझे उपकार ।।३।।


शिव-फुलेंच्या आदर्शातूनी

 दिले डाॕ.आंबेडकरांनी संविधान 

  गे माय थोर तुझे उपकार ।।४।।


जय जवान जय किसान 

 जयघोषातूनि उमले तुझा सन्मान 

  गे माय थोर तुझे उपकार ।।५।।


असाच घडला सार्वभौम भारत

 नित्य तयाचा आम्हा अभिमान 

  गे माय थोर तुझे उपकार ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन