गडकिल्ले
गडकिल्ले
ज्यांच्याविना अधुरे होते स्वराज्य
त्यांच्यावरच तर होती भिस्त स्वराज्याची
शिवबांसह लढले मावळे यांच्यासाठी
हे गड किल्लेच तर आहेत शान महाराष्ट्राची
तोरणगड सजला स्वराज्याच्या तोरणाने
राजगड झाली राजधानी स्वराज्याची
शिवनेरी गडावर जन्म झाला शिवबांचा
पुरंदर गड होती जन्मभूमी शूर संभाजींची
प्रत्येक गडकिल्ल्याने दाखवला पराक्रम
लाखमोलाच्या एकेका मावळ्याचा
गडकिल्ल्यांनी राखला अनमोल वारसा
महाराष्ट्रातील शूर परंपरांचा
या गडकिल्ल्यांचे करु जतन आपण
आदर्श शौर्याचे दाखवू पिढीला नव्या
नका रेखाटू नावे अन् चित्रे यांच्या भिंतींवर
वास्तू अबाधित या आपणच ठेवायला हव्या
