गाव प्यारं आहे...
गाव प्यारं आहे...
1 min
379
गावापासून मी दूर
आपल्यावाचून मजबूर
जगापेक्षा मला गाव प्यारं आहे....
शहरात हरवले क्षण
कश्यासाठी फिरे वणवण
डोळ्यात माझ्या दुःख सारं आहे....
खूप पैसे कमविले
जीवन शहरात घालविले
माझं गावातलं स्वप्नं न्यारं आहे....
नको दुधावरची मलई
मला गावाकडं जाण्याची घाई
डोक्यावर माझ्या गावचा भार आहे....
संगमच नाव तिथे मिळावं
आठवण मला माझं गाव
पायी चाललो जवळ कार आहे....
