STORYMIRROR

Mohini Limaye

Others

3  

Mohini Limaye

Others

एकदातरी जग स्वतःसाठी

एकदातरी जग स्वतःसाठी

1 min
349

जन्माला येतेस आई-वडिलांच्या सुखासाठी

त्यांना सुख देताना जगत असतेस कुळासाठी

बहिण होतेस भावाची देण्या त्याला प्रेमासाठी

भाऊरायाची ताई होताना जगत असतेस भाचरांसाठी

पत्नी होतेस कोणाची शय्यासोबत करण्यासाठी

होतेस दुसऱ्या घरची सून जपण्या त्यांच्या घराण्यासाठी

आई होतेस सुखावतेस झटतेस त्या लेकरांसाठी

सतत पाठपुरावा करतेस त्यांना संस्कार देण्यासाठी

सासू होतेस जबाबदार सुनेला सांभाळून घेण्यासाठी

रमुन जातेस नातवंडांत मुलाचा संसार फुलवण्यासाठी

अगं बघ या सगळ्यात तुझे अस्तित्व फक्त इतरांसाठी

असतील ते तुझेच तरीही तू जगणार कधी गं स्वत:साठी

झटकून टाक पाश हे सारे झेप घेण्या उंच गगनी

हो मुक्त हो लुप्त हो बेधुंद एक गगनभरारी घेण्या तव प्रांगणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन