एकच आयुष्य
एकच आयुष्य
1 min
11.2K
एकच चहा तो पण कटिंग
एकच सिनेमा तो पण टॅक्स फ्री
एकच साद ती पण मनापासून
अजून काय हवे असते मित्राकडून...
एकच भूताची गोष्ट ती पण वंगातून
एकच श्रीखंडाची वडी ती पण अर्धी तोडून
एकच जोरदार चपाटा तो पण दम टाकून
अजून काय हवे असते शिक्षकांकडून...
एकच मायेची हाक ती पण कुरवाळून
एकच गरम पोळी ती पण तूप लावून
एकच आशीर्वाद तो पण आपली प्रगती सोडून
अजून काय हवे असते आईकडून...
