एकांत इतकाही वाईट नाही
एकांत इतकाही वाईट नाही
एकांत इतकाही वाईट नाही
समाज फक्त त्याचे बाह्यरुप पाही
एकांत म्हणजे काय?
हे नाही समजत लगेच
तरीही हे लोक त्यास वाईट का मानतात ?
हे मला समजत नाही
एकांत म्हणजे विश्व दुसरे
अज्ञानाकडून अनंताकडे जाण्याचे
एकांत म्हणजे मनाचे
आपल्या राजा होण्याचे
नसेल ओरडणारा कोणी तिथे
नाही असेल कोणी स्पर्धा करणारा
आपणच सर्वस्व आहोत तिथे
तरीही अर्थ एकांताचा
वाटे सर्वांना वेगळा
नाही त्यास नाक,मुख आणि गळा
तरी संकटसमयी तोच कामी येतो पहा
एकांत म्हणजे आहे आजार मानसिकतेचा
म्हणून समाज खोट्या अस्मीतेचा
नाही घेत जवळ एकांताला
अन् बोलावतो जवळ कोरोनाला
खरच एकांत इतकाही वाईट नाही
समाजाच्या खोट्या लोकापासून लांब
एक असते अवस्था अशी
ज्यास म्हणतात सर्व आत्मज्ञान
या ज्ञानाला नाही तोड कोणते
कारण ते फक्त एकांतात प्राप्त होते
नसते गरजेचे त्यास
रहाणे ध्यानस्थ आपणांस
अणि नाही गरजेचे
तुमच्या सवयी बदलण्याचे
पहा जरा स्वत:कडे
समजेल तुम्हास तेव्हा
या बर्हीमुख समाजात
अंतर्मुखास का ते मानतात?
खरंच कधीतरी रहा घरात
नाही गरजेचे जाणे समाजात
या कोरोनाच्या महाघडीला
तुम्ही जवळ करा एकांताला
कारण एकांत खरच इतका वाईट नाही