एक विसावा तुझ्या दयेचा (भक्तीगीत)
एक विसावा तुझ्या दयेचा (भक्तीगीत)
तुझिया चरणी अर्पूनी मी पण, जीवन हे उजळू दे
एक विसावा तुझ्या दयेचा, मनांस माझ्या मिळू दे।।धृ।।
भक्त वत्सला दिनदयाळा,तव कृपेनेच मार्ग मोकळा
संन्नीतीच्या वाटेवरती,संसार हा उजळू दे
तुझिया चरणी अर्पूनी मी पण, जीवन हे उजळू दे
एक विसावा................................।।१।।
दीनजनांचा तु कैवारी,तव दर्शन हा ध्यास ही जरी
अहम् मनाचा विरूनी संसारी,भक्तीरसातच जळू दे
तुझिया चरणी अर्पूनी मी पण, जीवन हे उजळू दे
एक विसावा..................................।।२।।
नितांत सुंदर ध्यान मनोहर,मिटवूनी सारा अंधःकार
अखंड नामाचा तो गजर,चराचरास या कळू दे
तुझिया चरणी अर्पूनी मी पण, जीवन हे उजळू दे
एक विसावा.....................................।।३।।
दारिद्र्य दुःख अन् नैराश्याला,उजळूनी दीपाच्या आशेला
तुझाच आशिष हाच वशीला,मम भाग्यासी मिळू दे
तुझिया चरणी अर्पूनी मी पण, जीवन हे उजळू दे
एक विसावा....................................।।४।।