ए सांग ना
ए सांग ना
1 min
223
तुझ्या माझ्या नात्याचे नाव तरी काय..??
कधी म्हणते हाय, तर कधी म्हणते बाय..!!
तुझे संभ्रमित वागणे मला तरी पटत नाही..
पण हृदयाच्या धडधडीला शब्दही फुटत नाही..!!
कधी भेटतेस वाटेवर, खूप काही बोलतेस..
अन् नेमक्या प्रश्नाला तू अबोल होऊन टाळतेस..!!
कळलंय मलाही तू कोणावर तरी भाळतेस..
दूर निघून जाते तेव्हा हळूच मागे वळतेस..!!
संकेत अबोल मनाचे तू नकळत देऊन जाते..
माझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या नजरेतून व्यक्त होते..!!
