द्विधा मन
द्विधा मन
द्विधा मन अभ्यासवृत्तीतला,
परिक्षेतील मिळणाऱ्या मार्कांतला.
जिद्दीने पास होत पुढेच राहण्याचा,
विचारांने धडधडणाऱ्या काळजाचा.
द्विधा मन हा लग्नाचा,
केले नाही केले तरी पचताविण्याचा.
लग्न, परिवार तो खेळ लाॅटरीचा,
एकास शाप,एकास सुखसमृद्धीचा.
द्विधा मन परंपरा, संस्कृतीत,
माहेर सोडून सासरी जात.
कशी असतील ती ही नाती,
मनाचा ठाव घेत हात हाती.
द्विधा मन साथीदाराच्या सहवासात,
सामंजस्यसाने नात फुलवीत.
गैरसमज, अहंम भावना जाळत,
संसारी निशिगंध दरवळत.
द्विधा मन घरी बाळ येण्याचा,
उगाच अधीर होत भावनांचा.
मुलांच्या गरूड झेप शिक्षणाचा,
त्यांचेच सुख पाहत जगण्याचा.
द्विधा मन वार्धक्याकडे झुकणारा.
जीवलगांचा हात सोडत जगणारा.
संसारी दंग मुलांशी संवाद शोधणारा,
अंतरी परिमळत श्वास सोडणारा.
