STORYMIRROR

Kaustubh Wadate

Others

4  

Kaustubh Wadate

Others

दूर देशीच्या..

दूर देशीच्या..

1 min
27.4K


कधी दूर देशीच्या समुद्र किनारी जावं,

दूर नजर जाईल तिथंपर्यंत सागराला पहावं,

धावणा-या जीवाला थोडं शांत करावं,

या लाटांच्या फेसाळण्यामधून सुख सापडावं,

कधीतरी दूर देशीच्या समुद्र किनारी जावं..

हे निळं आकाश मनांत खोलं साठवावं,

आकाशाचं निळं प्रतिबिंब पाण्यात दिसावं,

मध्येच कुठल्यातरी पक्ष्याचं गीत ऐकावं,

नारळाच्या झाडासंगे मनही थोडं झुलावं,

कधीतरी दूर देशीच्या समुद्र किनारी जाव..

आकाशाचं अन् समुद्राच मिलन न्याहाळावं,

दूरवर पसरलेलं पाणी उन्हांत चमकावं,

मग किना-यावर जाऊन पाण्यात उभं रहावं,

अन् दोन्ही हात जोडून निसर्गाला नमन करावं,

कधीतरी दूर देशीच्या समुद्र किनारी जाव..


Rate this content
Log in