दुपारची सावली
दुपारची सावली
1 min
858
दुपारची सावली
ही दुपारची सावली
कशी पायात लोळते
छोटी छोटी होऊनिया
पहा पायात घुसते.
ही सकाळच्या उन्हात
लांबलचकच पडते
उन्ह वाढता वाढता
पायाखाली विसावते.
सकाळी नि संध्याकाळी
ही फिरते भोवताल
शोधी दुपारी आसरा
ही पायाच्या खालोखाल.
शोधताना सावलीला
पुरे आपण थकतो
थकून भागून सारे
तिच्यावरच बसतो.
