STORYMIRROR

Vijay Bikkad

Others

4  

Vijay Bikkad

Others

दोन शब्द तुझ्यासाठी

दोन शब्द तुझ्यासाठी

1 min
164

तुझ्या आठवणीत घालवलेल्या

कित्येक रात्रींसाठी

तुझ्यावर ऐवढे प्रेम असताना

छोट्याशा मनाला जपण्यासाठी

हे दोन शब्द तुझ्यासाठी।।1।।


कळत नकळत झालेल्या

चुकीच्या चुकांसाठी

त्या चुकांची माफी मागायला

माझ्याकडे असणाऱ्या समजेसाठी

हे दोन शब्द तुझ्यासाठी ।।2।।


भिरभिरत्या मनाला

एकदा तरी गुंफण्यासाठी

तुझ्या धडधडणाऱ्या काळजाला

मिठीत घेण्यासाठी

हे दोन शब्द तुझ्यासाठी ।।3।।


कविता करताना

शब्द न शब्द तुझ्याचसाठी

आज खुल्या मनाने लिहिताना

आजवरच्या सगळ्या कविता

फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ।।5।।


आयुष्याभर फक्त तुझ्यावरच

प्रेम करण्यासाठी

हे दोन शब्द तुझ्यासाठी ।।4।।


Rate this content
Log in