दिवास्वप्न
दिवास्वप्न
कुणी घर देता का? घर म्हणत,
नटसम्राट आठवत रोज हिंडले.
घराच्या स्वप्नात तारुण्य हे सरले.
नियतीचा खेळ खेळत, जीवन सरले.
भ्रष्टाचाऱ्याची झळ नको तितकी सोसली.
न्यायालयाच्या कोठडी मी उभी दिसली.
गुन्हेगार बिल्डर रूपये फेकत हसला.
मी माझ्या नशिबाला दोष देत लढली.
दिवास्वप्न हे माझे हक्काचे घराचे,
बिल्डरने,कोर्ट कचेरीने लूटलेले.
तारूण्य सरे रक्तदाब, मधुमेहाने घेरलेले.
५ चे ८० लाखाचे घर स्वप्नात विरलेले.
न्यायाचे दाद पंधरा वीस वर्षे चालते.
सरकार फक्त विचार करत बसतोय.
चोर हा सावकार होऊन मिरवतोय.
सामान्य माणूस दगड होऊन जगतोय.
विश्वासाचे लढू भ्रष्टाचाऱ्यांचा कहर.
प्रेमाच्या अतुल्य विश्वासाने पचवू जहर.
एकमेका साथ देत जिंकू संघर्ष तरंग.
वादळात, वाट काढत बनले सुरंग.
