STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
314

दिप लावुनी अंगणी 

प्रकाशित संस्काराची 

दिप उजळती मनी 

कृपा असे ईश्वराची ||१|| 


सायंकाळी दिप सांगे 

देव्हाऱ्यात देव वसे 

प्रसन्नतेने उजळे 

जगण्याची आस असे ||२|| 


लावता अंगणी दिप

सुरुवात दिवाळीची

सरसरत्या वाऱ्याने  

लाट उठे आनंदाची‌ ||३|| 


झगमगती हे दिवे 

होई वर्षाव फुलांचा 

आनंदात नाहूनिया

सण पहा दिवाळीचा ||४|| 


अशी ही रम्य पहाट

दावे दिस‌ आनंदाचा

मंगलमय दिव्यांनी

दिप उजळे सणाचा ||५|| 



Rate this content
Log in