दिवाळी
दिवाळी
1 min
765
सण आला दिवाळी
बहीण भावाला ओवाळी
सण आला दिवाळी
बनवली पुरणपोळी //1//
सण आला दिवाळी
तोरण दारी शोभे भारी
सण आला दिवाळी
अंगणी शोभे रांगोळी //2//
सण आला दिवाळी
दिव्याची रोषणाई भारी
सण आला दिवाळी
पणत्यांची मांदियाळी //3//
सण आला दिवाळी
लक्ष्मीपूजा आरास भारी
सण आला दिवाळी
फटाक्यांची आतषबाजी भारी //4//
सण आला दिवाळी
फराळाचे पदार्थ भारी
सण आला दिवाळी
भरजरी कपड्यांची शोभा न्यारी //5//
सण आला दिवाळी
पाहुण्यांची चाहूल भारी
सण आला दिवाळी
उत्सव साजरा करू या भारी //6//
