दिवाळी
दिवाळी
1 min
420
अंतरंगा साज चढे
आतुरता दिवाळीची,
स्वप्नधुंद मन होई
रोषणाई आनंदाची...
कणकण साफसूफ
सज्ज स्वागता होऊनी,
किती क्षणांचे नाविन्य
मनी चैतन्य जागूनी...
दारी मंगल रांगोळी
कंदीलाची चमचम,
लखलख दिवा करी
गोड-धोड घमघम...
आतुरता दिवाळीची
क्षण फुलले मनाचे,
सौख्य क्षणा आतुरले
हक्क सारे जीवनाचे...
नाविन्याची चैतन्याची
करू साजरी दिवाळी,
प्रेम देऊ-घेऊ सारे
असे हर्षाची फराळी..