दिसेना गावं....
दिसेना गावं....
1 min
539
चारी दिशात झालं नावं
डोळ्यांपुढे दिसेना गावं....
सारं काही आज मिळालं
मी कोण जगाला कळालं
कुठे आहेत माझे कोणा पहावं....
जन्म घेतला ज्या मातीत
माझ्या गावात माझं अतीत
एकटं मनं दुख सोबती राव....
उंच घेतली आहे मी झेप
मनावर लावून दुखाचा लेप
रडतो एकटा मी कसं हसावं....
येतं नव्हतं मला काही
संगमच जग नावं पेपरात पाही
हरवली नाती गोती का जगावं.....
