STORYMIRROR

Kavita Pudale

Others

4  

Kavita Pudale

Others

दिस बुडाला

दिस बुडाला

1 min
26.8K


दिस बुडाला

पाखरे निघे घराला

ओढ जीवाला लागे

इवल्याशा पिल्यांची


दिस बुडाला

अंधार झाला

ओढ पिलांची लागे

आर्त हाक वात्सल्याची


दिस बुडाला

वेग पंखाना आला

वेगी धावू लागे

हाक ऐकू येई पिलांची


दिस बुडाला

मन शोधे घरटयाला

वेड लागे

आठवण येई पिलांची


दिस बुडाला

लागे घरटे दिसायला

पिल्ले बिलगे

भेट होई मातेची .


साहित्याला गुण द्या
लॉग इन