STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

दीप

दीप

1 min
196

दीप लावुनी अंगणी 

प्रकाशित संस्काराची 

दीप उजळती मना 

कृपा असे ईश्वराची ||१|| 


सायंकाळी दीप सांगे 

देवाऱ्यात देव वसे 

प्रसन्नतेने उजळे 

जगण्याची आस असे ||२|| 


आषाढाची दीपपूजा 

सुरुवात श्रावणाची 

ऊन वारा व पाऊस 

लाट उठे आनंदाची‌ ||३|| 


झगमगती हे दिवे 

होई वर्षाव फुलांचा 

नैवेद्याला लागे खीर 

आगमन श्रावणाचा ||४|| 


येता पहा सोमवार 

महादेवाच्या भक्तीचा 

दूध बेल वाहुनिया 

दीप उजळे भक्तीचा ||५|| 


Rate this content
Log in