धुके
धुके
1 min
188
धुंद सकाळी वाट काढी
चालती पावले धुक्यात
गर्द धुके हे अवतरले
निसर्गाच्या सानिध्यात
शुभ्र धुके पसरले
प्रत्येक फांदीवरती
दवबिंदूचे टपोरे दाणे
पाहता लाली येई गालावरती
पक्षी गाती गाणे सुरात
बहरून येई सुंदर पहाट
नटलेली वनराई पाहता
मन आनंदाने गाई सुसाट
दवबिंदूच्या प्रसन्नतेने
भिजुनी गेली काया
या नयनरम्य दृश्यातूनी
दिसे मज निसर्गाची छाया
दाट धुक्यातुनी शोधतो
मी माझी पाऊलवाट
आनंदाचा साज लेऊनी
आली धुक्याची पहाट
