... धनाचा लोभी....
... धनाचा लोभी....
1 min
590
स्वभाव माणसाचा लालची
सुधारणार नाही
बघून नजरेसमोर नोटा
लाळ टपकल्याशिवाय राहणार नाही...
मिळाले सुख कितीही तरी
समाधानकारक नसे
स्वार्थी स्वभाव मनुष्याचा
धनासाठी हावरट असे...
पत्करून सर्व संकटे
लोभीपणा बाळगत आहे
पैशांचा मोह मानवाला
खड्डयात ढकलत आहे...
वेडापिसा होऊन
पैशासाठी धावत आहे
कमवण्यासाठी पैसा
रात्रीचा दिवस करीत आहे...
धनाचा लोभी म्हणून
होईल तुझी ख्याती
जे आहे धन ते राहिल इथेच
सुधार आता मनुजा तुझी वृत्ती...
