धागा रेशीम बंधाचा
धागा रेशीम बंधाचा
1 min
44
वाट पाही रक्षाबंधनाची
भाऊ राय कधी येई
आठवण आहे अजून
राखी साठी भांडत जाई.।।।१।।।
अजूनही आठवते,
राखी घायला पैसे नसायचे,
किती समजूतदार होतास रे तू,
गोधडीचा दोरा बांधायची.।।।२।।।
कितीतरी भांडलो असेल,
खूप खूप मस्ती केली,
रक्षाबंधन आलं की सार काही
विसरून, रक्षाबंधन केलं.।।।३।।।
वाट पाहून डोळे सासुसले
कधी येई भाऊराया
साडी चोळी नाही पाहिजे
संकट काळी रक्षण भाऊराया.।।।४।।