देवा मला पावशील का ?
देवा मला पावशील का ?
देवा मला पावशील का? माझे बालपण मला दावशील का?
पदराने नाक पूसून कवेत घेणारी आई दावशील का? ।
कडेवर घेवून चदामांमा दावशील का?
मायेने आचाळाला लावशील का?
देवा मला पावशील का?माझे बालपण मला दावशील का? ॥
अंगणात मातीशी नाती ठेवशील का?
माझ्याशी लहान होऊन खेळशील का?
घरात पाळण्यात ठेवून अंगाई गाशील का?
आईच्या कुशीत मला पदराखाली ठेवशील का? ॥ ॥
देवा मला पावशील का?माझे बालपण मला दावशील का?
शेजारच्या पोरींना भातुकलीचा खेळ दावशील का?
आपण सारे एक हे दावशील का?
देवा मला पावशील का?माझे बालपण मला दावशील का?
राजा राणीच्या चार गोष्टी सांगिशील का?
मोबाइलच्या ऐवजी माझ्याशी बोलशील का? ॥ ॥ ॥
देवा मला पावशील का?माझे बालपण मला दावशील का?
अंगत पगंत सारे दोन घास भरवशील का?
घर एक मंदिर मला दावशील का? ॥ ॥
देवा मला पावशील का?माझे बालपण मला दावशील का?
आई वडील हेच खरे देव मला सांगशिल का?
प्रेम -पूजा माया ममता मला दावशील का?